सोनपेठ प्रतिनिधीः सोनपेठ येथून ग्रामीण भागासह लांब पल्ल्याची बससेवा चालू करण्याबाबत सोनपेठ शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देताच सोनपेठ येथे ग्रामीण भागासाठी बससेवा चालू करण्यात आली असून शिवसेनेच्या मागणीला यश आले आहे. सोनपेठ ते शिर्शी, लासीना, लोहिग्राम तसेच विटा, डिघोळ या ग्रामीण भागातील नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच रुग्णांसाठी शटल बससेवा चालू करण्यात यावी तसेच औरंगाबाद, नांदेड, बीड, लातूर येथे लांब पल्ल्याच्या बस तात्काळ सुरू करण्याची मागणी सोनपेठ शिवसेनेच्या वतीने दि.२३ डिसेंबर रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच ही बससेवा चालू नाही झाली तर दि.०४ जानेवारी रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. परंतु शिवसेनेच्या मागणीची गंभीरतेने दखल घेत सोनपेठ येथे शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. दि.०४ रोजी सोनपेठ येथून सोनपेठ ते शिर्शी, सोनपेठ ते विटा तसेच सोनपेठ ते डिघोळ ही शटल सेवा चालू करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
कृष्णा पिंगळे - शिवसेना शहरप्रमुख
सोनपेठ हा अतिशय दुर्गम भाग समजला जात असून या भागातील सर्व नागरिक तसेच विद्यार्थी व रुग्णांसाठी ग्रामीण भागाला जोडणारी बससेवा तसेच लांब पल्ल्याची बससेवा चालू करण्याची मागणी आम्ही नुकतीच केली होती. तसेच आंदोलनाचा देखील इशारा दिला होता. आता केवळ ग्रामीण भागात चालणारी शटल सेवा चालू झाली असून भविष्यात लांब पल्ल्याची बससेवा चालू करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
शिवसेनेच्या इशाऱ्या नंतर बससेवा सुरू
सोनपेठ येथे ग्रामीण भागासाठी बससेवा चालू

Loading...