सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सरकार प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या घोषणा करत आहे. त्या घोषणांची काही प्रमाणात अंमलबजावणी पण होत आहे. तर काही समाजावर घोषणा करुनही गंभीर वेळ आली आहे. त्यामुळे सरकार करतंय काय? असा सवाल उपस्थित करत सोनपेठमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की, मुस्लिम समाजाची परिस्थिती आर्थिक,शैक्षणीक,सामाजिक,राजकीय अतिमागास झालेली आहे. मुस्लिम समाजाच्या युवकांकडे गुणवत्ता असूनही शिक्षण घेता येत नाही. प्रमुख कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती त्यामुळे मुस्लिम समाजाचे युवक वेगळ्या प्रवाहात जाऊन व्यसनी होत आहेत. पर्यायाने मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ समाजातील तरुणावर आली आहे. शासनाने समाजास शिक्षण आणि नोकरीसाठी १०% आरक्षण लागू करावे. अशी मागणी सदर निवेदनात नमूद करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम निर्णायक आरक्षण आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचे मत साजेद कुरेशी यांनी व्यक्त केले असून. सदर मागण्याचे निवेदन परीविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांना देण्यात आले. निवेदनावर सैफुल्ला सौदागर,परिवर्तन मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार खदीरबापू विटेकर,साजेद कुरेशी,अजीम शेख,फेरोज शेख,अजर शेख आदीसह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुस्लिम समाजाला पण आरक्षण द्या, आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलीय.
मुस्लिम समाजाच्या युवकांकडे गुणवत्ता असूनही शिक्षण घेता येत नाही. प्रमुख कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती त्यामुळे मुस्लिम समाजाचे युवक वेगळ्या प्रवाहात जाऊन व्यसनी होत आहेत.

Loading...