राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, सातवांच्या जागी कोणाला संधी?

महाराष्ट्रातील काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं जागा रिक्त झाली होती.

राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, सातवांच्या जागी कोणाला संधी?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या सहा जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार असून याच दिवशी निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. दरम्यान जुलै महिन्यामध्ये राज्यसभेच्या १४ जागा रिक्त असताना निवडणूक आयोगाने केवळ एकाच जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु आता पुन्हा पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.

राज्यसभेच्या एकूण ६ रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे.

राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत राजकारणापासून काहिसं दूर असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव या पती राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवतील हे स्पष्ट झालं आहे. तर, राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना संधी देणार का पाहावं लागणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.