जामियातील प्राध्यापकाचा फुत्कार
सीएएचे समर्थन करणारे जामियातील विद्यार्थी नापास
जामिया मुस्लीम विद्यापिठात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सीएएचे समर्थन करणा-या १५ गैरमुस्लीम मुलांना चक्क नापास केले आणि तशी पोस्ट नापास करणा-या प्राध्यापकाने सोशल मिडियावर टाकली.
या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यानंतर जामिया विद्यापिठाने या प्राध्यापकास निलंबित केले आहे.
प्रा. डॉ. अबरार अहमद यांनी व्टिटरवर पोस्ट टाकून लिहिले की, “मी सीएएचे समर्थन करणा-या १५ गैरमुस्लीम विदयार्थ्याना नापास केले आहे.“ अशा स्वरूपाची पोस्ट पडल्याने विद्यापिठ परिसरात गोंधळाला सुरूवात झाली.
या गोंधळानंतर मात्र डॉ अबरार खान यांनी सावरासावरीची भुमिका घेत ते केवळ व्यंग असल्याचे सांगितले. व देशातील सरकार विशिष्ट धर्मावर अन्याय करत असल्याची ओरड देखील केली.
ही पोस्ट
या प्रकरणातील गांभिर्य ओळखत जामियाच्या व्यवस्थापनाने तत्काळ व्टिट करत डॉ. अबरार खान यांना निलंबीत करत असल्याची घोषणा केली. हे गैरवर्तन असून या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अबरार खान यांना निलंबीत केल्याचे कळवले आहे.
अबरार आपल्या पोस्टमध्ये सीएए समर्थक विद्यार्थ्याना धडा शिकविण्याची धमकी द्यायला देखील मागेपुढे बघताना दिसत नाहीत.