कंगना रणौतचा पद्म पुरस्कार ताबडतोब रद्द करा-निलम गोऱ्हे

कंगना राणैात पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

कंगना रणौतचा पद्म पुरस्कार ताबडतोब रद्द करा-निलम गोऱ्हे

मुंबई- १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, असं वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना रणौवतने केलं आहे. टाइम्स नाऊच्या समिट २०२१ या कार्यक्रमात तिने हे विधान केलं आहे."सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीख होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं,"असं कंगना म्हणाली.

निलम गोऱ्हेंनी काय मागणी केली?

"सन्मानीय राष्ट्रपती महोदयांनी कंगना राणौतला नुकताच पद्म पुरस्कार प्रदान केला. त्याच्या नंतर कंगना राणौतने आज अत्यंत बेजबाबदर,निराधार आणि स्वातंत्र्य योद्धयांचा अपमान करणारे विधान केलं आहे. त्याचा मी निषेध करते"असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

"प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असणारी त्याच्यासाठी काहीही वक्तव्य करणाऱ्या कंगना रणौतने १९४७च्या स्वातंत्र्य लढ्यात जीवन संमर्पित करणाऱ्या योद्धायांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला. त्यामुळे तिचा पद्म पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करत आहे" असे निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.