कार्तिकी यात्रा रद्दच...,पंढरपूरात  ४ दिवस  संचारबंदी लागू

1 min read

कार्तिकी यात्रा रद्दच...,पंढरपूरात ४ दिवस संचारबंदी लागू

पंढरपुरात ४ दिवस एसटीसेवा बंद राहणार

श्वेता भेंडारकर/ पंढरपुर : कार्तिक यात्रेच्या काळात संचारबदी लागू होणार असून चार दिवस एसटी बससेवा बंद राहणार असल्याचे अतिरक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले .कोरोनाचा प्रदुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
   कार्तिक एकादशी सोहळा २६ नोव्हेंबर रोजी आहे . त्यामुळे दशमीच्या रात्री १२ वाजेपासून म्हणजेच २५ नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यांत म्हणजेच २६ नोव्हेंबर पर्य़ंंत पंढरपुर  शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटर पर्यंत संचारबंदी लागू केली जाणार असल्याचेही  झेंडे यांनी सांगीतले. या यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपुरमध्ये २२ नोव्हेंबर रात्री बारा वाजेपासून २६ नोव्हेंबर रात्री बारा  वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.