कंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.

1 min read

कंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.

अभिनेत्री कंगना रनौत ने मुंबई चे वर्णन पाकव्यात कश्मिर केल्यानंतर वादाला सुरूवात झाली.

स्वप्नील कुमावत/औरंगाबाद: अभिनेत्री कंगना रनौत ने मुंबई ही पाकव्यात कश्मिर आहे असं वादग्रस्त वक्तव्य केल होत. याच वक्तव्याचा निषेध नोंदवत महाराष्ट्रभर कंगनाच्या विरोधात आंदोलन चालू आहेत.
WhatsApp-Image-2020-09-06-at-3.11.49-PM-1
औरंगाबादमधीत क्रांती चौकात अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शिवसैनिकांसह आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकिशोर घोडले यांच्या विरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आंदोलनासाठी रितसर परवानगी न घेतल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही, शिवसैनिक, आमदार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने, कंगना शिवसेनेला भारी पडू लागली की काय, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.