कॅटकडून 500 पेक्षा जास्त चिनी वस्तूंची यादी जाहीर

1 min read

कॅटकडून 500 पेक्षा जास्त चिनी वस्तूंची यादी जाहीर

भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर देशात चिनी वस्तूंवरील बहिष्काराची तीव्रता वाढत असून कॅटकडून 500 पेक्षा जास्ता चिनी वस्तूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईः कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटतर्फे सुरु असलेल्या चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार आहे. कॅटने 500 पेक्ष जास्त चायनीज वस्तंची यादी जाहीर केली असून त्यावर बहिष्कार घालण्याचं नियोजन केली. कॉन्पेडरेशनचे राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी यांनी ही माहिती दिली. मागील काही दिवसापासून भारत चीन सीमावाद सुरु आहे. दि. 16 जून रोजी भारत चीन सैन्यामध्ये लडाख सीमेजवळ गलवान खो-यात चकमक झाली. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर देशात चिनी वस्तूंच्या बहिष्कार मोहिम आधिक सक्रिय झाली आहे.

कॅटकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, कापड, चप्पल, वस्त्रे, स्वयंपाकघरातील साहित्य, बिल्डर हार्डवेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तू इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. डिसेंबर 2021 पर्यंत चिनी वस्तूंची आयात एक लाख कोटींनी कमी करावी, हा या बहिष्करामागील उद्देश आहे. भारतीय रेलवे ने चिनी कंपऩ्याना दिलेल्या प्रोजेक्ट रद्द केले आहे. यामुळे चीन येत्या काळा मोठ्या आडचणीला समोरे जावे लागणार आहे. पंतप्रधान नरेद्रं मोदी यांनी यापुर्वी भारताला आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठातून चिनी वस्तू लवकर हद्दपार करण्याची तयारी सरकारी पातळीवर सुरु झाली आहे. देशातील सर्वच पातळीवर चिनी वस्तूंचा बाहिष्कार करण्याची तयारी सुरु झाली आहे.