सीबीआयची महाराष्ट्रात नाकाबंदी

1 min read

सीबीआयची महाराष्ट्रात नाकाबंदी

सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी -अनिल देशमुख

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र मुंबई पोलीस जो तपास करत होते. तो तपास पुढे  सीबीआयला देण्यात आला.  TRP घोटाळ्याच्या तपासातही तसेच झाले, पण मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक सर्वांना माहिती आहे, तरी त्यांना बदनाम करण्याचे  काम सुरू आहे. सीबीआय ही अत्यंत प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्यांचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका आहे. त्यामुळे राज्य सरकारने सीबीआयची महाराष्ट्रात नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

सीबीआय यापुढे महाराष्ट्राच्या परवानगीशिवाय राज्यात चौकशी करु शकणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सीबीआयला जे काही करायचे आहे, त्यासाठी आता राज्याची परवानगी घ्यावी लागेल. सीबीआय ही अत्यंत प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्यांचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका आहे, त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

सीबीआयला महाराष्ट्रात येऊन चौकशी करण्याचा अधिकार होता. 1989 मध्ये सीबीआयला परवानगी दिली. आता राज्याच्या पूर्वपरवागनीशिवाय सीबीआयला चौकशी करता येणार नाही, असे आदेश गृह विभागाने काल काढले आहेत, असे देशमुख यांनी सांगितले . काही राज्यातही सीबीआयवर अशी बंदी घालण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. मुंबई पोलीस टीआरपी केसची चौकशी करत आहेत. उत्तर प्रदेशात गुन्हा नोंद असून त्याची चौकशी सीबीआयला दिली. पुढे जाऊन काहीही होऊ शकते. राजकीय दबावापोटी केसेस सीबीआयला दिल्या. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी सीबीआयला पिंजऱ्यातील पोपट म्हटले, याकडेही गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले.