मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत केलेल्या जीवघेण्या मारहाणीची सीबीआय चौकशी करा-अनंत करमुसे

या प्रकरणी मंत्री आव्हाड यांच्याकडून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मारहाण झालेले नागरिक अनंत करमुसे यांनी केली आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत  केलेल्या जीवघेण्या मारहाणीची सीबीआय चौकशी करा-अनंत करमुसे
अनंत करमुसेला का मारले? नेमकं प्रकरण आहे तरी काय?

ठाणे: राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत माझ्यावर जीवघेण्या केलेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी अनंत करमुसे य़ांनी भाजपचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांच्याकडे केली आहे.

भाजपचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची मागणी.

राज्यात लॉकडाऊन सुरू असताना 5 एप्रिल रोजी अनंत करमुसे यांना त्यांच्या घोडबंदर रोड येथील घरातून नेण्यात आले. त्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे पोलीस सुरक्षा रक्षक व गुडांचा सहभाग होता. त्यानंतर आव्हाडांच्या बंगल्यात त्यांच्याचसमोर मला बेदम मारहाण करून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अनंत करमुसे यांनी केला आहे.
या प्रकरणी मंत्री आव्हाड यांच्याकडून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मारहाण झालेले नागरिक अनंत करमुसे यांनी केली आहे.
खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची ठाण्यात आज भेट घेऊन करमुसे यांनी निवेदन दिले. तसेच केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.