सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांची जयंती सोनपेठ तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांची 85 वी जयंती सोनपेठ तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात आली. दि.3 रोजी शेळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकारी अनिरुद्ध हाळवे,मनिष भुसारी व गंगाधर गायकवाड यांनी कोरोनाच्या काळात दत्तक गावात जाऊन तीन हजार शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप केले. त्यासाठी कमीतकमी कागदपत्रे घेतली.या बद्दल शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वाडी पिंपळगाव येथे शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे श्री.माऊली जोगदंड, विश्वंभर गोरवे,आण्णा जोगदंड, देविदास भुजबळ,भारत गोरवे,दिशान काझी, विष्णुपंत देशपांडे, सुधाकरराव आरगडे, रामेश्वर मुलगीर, माणिक आळसे, भागवत मुलगीर, माधव जाधव, सोमनाथ नागुरे, दशरथ धानूरकर, मलिकार्जून वारकरे तसेच महिला आघाडीच्या रंजना जाधव, पदमीन बाई धानूरकर, सुदामती जाधव आदीची उपस्थिती होती.
पिक कर्ज वाटप करून शरद जोशी यांची जयंती साजरी.
शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून तीन हजार शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप.

Loading...