वसुलीबाजांसाठी कोठडीची दारे उघडली-अतुल भातखळकर

अनिल देशमुख यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी केलेली याचिकाही हायकोर्टाने फेटाळली आहे.

वसुलीबाजांसाठी कोठडीची दारे उघडली-अतुल भातखळकर

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने दणका दिला. सीबीआयच्या एफआयआरविरोधात राज्य सरकारची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. सीबीआय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयाचा तपास करू शकते, असे हायकोर्टाने म्हटले आहे. अश्या प्रकारे स्थगिती देणे तपासावर परिणाम करू शकते, असे हायकोर्टाने म्हटले आहे. यासोबत अनिल देशमुख यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी केलेली याचिकाही हायकोर्टाने फेटाळली आहे.यकोर्टाच्या या निर्णयानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

राज्य सरकारसह अनिल देशमुखांना मोठा झटका
गुन्हा रद्द करण्यासाठीची याचिका हायकोर्टानं फेटाळली

बारमालकांकडून वसुली करणाऱ्या अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून हायकोर्टाने त्यांचे कायद्यापासून पळण्याचे मार्ग बंद केलेत. देशमुखांचे उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचेही तोंड काले झालेय. वसुलीबाजांसाठी कोठडीची दारे उघडली आहेत’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टिका केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.