चंदन पाटील नागराळकर पोहचले बांधावर; पिकांच्या नुकसानीची पाहणी

1 min read

चंदन पाटील नागराळकर पोहचले बांधावर; पिकांच्या नुकसानीची पाहणी

अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सोयाबीन, उडीद आणि ऊस पिके भुईसपाट झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

उदगीर तालुक्यातील नागलगाव व नळगीर मंडळात ढगफुटीमुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीची राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते चंदन पाटील नागराळकर यांनी बांधावर जाऊन पाहणी केली.

अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सोयाबीन, उडीद आणि ऊस  पिके भुईसपाट झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या अस्मानी संकटामुळे झालेल्या  नुकसानीच्या पाहणीसाठी चंदन पाटील यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे नागलगाव, कासराळ , सुमठाणात बांधावर पोहचले.

यावेळी प्रशासनातील मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी तसेच आपदग्रस्त शेतकरी उपस्थित होते.  अस्मानी संकटात कोसळलेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रयत्नशील राहील, असे चंदन पाटील नागराळकर यांनी म्हटले...