'चंद्रकांतदादा आपल जितक वय आहे तितकी पवारांची कारकीर्द'

आपण ४ दिवस दिल्लीत थांबूनही तुम्हाला अमित शाहा यांनी भेट नाकारली याबाबत तुम्ही आत्मचिंतन करावं

'चंद्रकांतदादा आपल जितक वय आहे तितकी पवारांची कारकीर्द'

पुणे : चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी शरद पवारांची संसदीय कारकिर्द आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चंद्रकात पाटील यांच्यावर टिका केली आहे. राज्यपाल यांचं वय झालं आणि शरद पवार साहेब यांचं वय झालं नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रुपाली चाकणकर यांनी व्हिडीओ ट्विट करून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. वयोमानामुळे राज्यपालांना लक्षात राहत नसावं म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असाव्यात असं शरद पवारांनी म्हटलं होतं. पवार बोलल्यानंतर चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या मदतीला धावून गेले. पहिली गोष्ट राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्टी चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावं, असा टोला चाकणकर यांनी लगावला.

तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज
दादा, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहा यांनी तुम्हाला भेट नाकारली. याचं जरा आत्मचिंतन करा. तेव्हाच कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि साहेबांवर काय बोलावं याचं तुम्हाला भान येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.