पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा-पोलीस निरीक्षक भातलवंडे

1 min read

पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा-पोलीस निरीक्षक भातलवंडे

मागील अडीच वर्षांपासून कार्यरत असलेल्या भातलवंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी कमी करत खाकीचे वर्चस्व प्रस्थापित केले होते.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: समाजात पोलीस काम करताना सत्याची बाजू पाहून घेतातच! मात्र उपेक्षित आणि वंचित असणाऱ्या घटकांना न्यायाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत करतात. त्यामुळे विष पेरणाऱ्या प्रवृत्तीपासून समाजातील युवकांनी बाजूला होऊन सामाजिक कार्यात कटीबद्धता ठेवत आपल्या भवितव्यासाठी झटले पाहीजे असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी बोलताना व्यक्त केले.
सोनपेठ मधून नुकतीच त्यांची लातूर येथे बदली झाली आहे. यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या संघटनांनी त्यांचा सत्कार आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की,सोनपेठ शहरातील आणि तालुक्यातील लोकांनी जे प्रेम दिले ते प्रेम कदापिही विसरणार नाही. सोनपेठमध्ये सोन्यासारखी माणसे राहत असल्याचा उल्लेख करत गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुन्ह्याचा कमी कालावधीत शोध लावत माणसे जोडण्याचे काम आपण केले आहे. ही माणसेच आपल्यासाठी आयुष्याची पर्वणी ठरणार असल्याने माणसाने माणसे जोडून कार्यरत रहावे असा संदेश यावेळी त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून दिला.मागील अडीच वर्षांपासून कार्यरत असलेल्या भातलवंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी कमी करत खाकीचे वर्चस्व प्रस्थापित केले होते.