चार वर्षात  ११० किलो वजन केले कमी

1 min read

चार वर्षात ११० किलो वजन केले कमी

जगातील सर्वात लठ्ठ मुलांमध्ये गणल्या जाणारया इंडोनेशियातील एका मुलाने चार वर्षात तब्बल ११० किलो वजन कमी केले आहे.

जगातील सर्वात लठ्ठ मुलांमध्ये गणल्या जाणारया इंडोनेशियातील एका मुलाने चार वर्षात तब्बल ११० किलो वजन कमी केले आहे.

वाढते वजन खरोखरच शरीरासाठी धोकादायकच ठरत असते. आणि हा धोका कमी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू वाढलेले वजन कमी करण्यासाठीही थोडाफार त्रास सहन करावाच लागतो. इंडोनेशियातील आर्य नाव असलेल्या मुलाच्या बाबतीतही काहीसे असेच घडले आहे. वजन कमी करण्यासाठी त्यालाही ञासाचा सामना करावा लागत आहे. त्याच्या अती वजनामुळे सर्वात लठ्ठ व्यकितमध्ये त्याचे नाव घेतले जात असे. परंतु नुकतेच त्याने आपले वजन कमी केले आहे. लठ्ठपणामुळे होणारा त्याचा ञासही कमी झाला आहे. अवघ्या चार वर्षाच्या कठीण परिश्रमानंतर त्याने तब्बल ११० किलो वजन कमी केले आहे.

आर्याचा हा नवीन लूक लोकांना अचंबीत करत आहे. त्याचे वजन कमी करण्याचे रहस्य जाणले तर २०१६ पासून त्याने आपल्या प्रवासाला सुरूवात केली होती. त्यावेळी त्याचे वजन १९८ किलो होते. या चार वर्षात त्याने ११० किलो वजन कमी केले आहे. त्याच्या ट्रेनरने सांगितले की, जेव्हा पहिल्यांदा मी आर्याच्या कुटूंबाला भेटलो तेव्हा सर्वात आधी त्याच्या दिनक्रमाविषयी विचारले आणि त्याला संतुलित आहार देण्यासाठी सांगितले. त्याला प्रोत्साहित केले. सुरूवातीला मी त्याला सोप्या सोप्या एर्क्ससाईज करायला सांगितले. यानंतर हळू हळू वेटलिफ्टिंग सुरू केले. यामुळे होणारया ञासाचा सामना त्याला करावा लागला परंतु नंतर त्याने अधिक परिश्रम घेऊन आपल्या वजनावर नियंञण मिळवले.