छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संघ

संघाच्या देशभरात तब्बल ५६ हजारांच्या पेक्षा अधिक शाखा आहेत. यात एक कोटीच्या आसपास स्वयंसेवक सहभागी असतात. . दरवर्षी ५६ हजार ठिकाणी शिवराज्यअभिषेक दिन साजरा होत असतो. रोज सकाळी कोटी स्वयंसेवक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रातःस्मरण करतात

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संघ

सात्तत्याने एक विषय समाज माध्यमातून समोर येत आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिवजयंती साजरी होते का? शिवजयंती साजरा करतानाचा फोटो दाखवा आणि मला संघ समर्थक समजा अशी आवाहान करणारी भाषा देखील वापरली जाते.
यात कांही स्पष्टता यायला हवी यासाठीच हा लेख लिहायला घेतला आहे. संघात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे महाराजांच्या जयंती दिनी अभिवादन करतानाचे फोटो आताच्या सरसंघचालकांचे काय या आधीच्या कोणत्याच सरसंघचालकांचे मिळणार नाहीत. पण असे फोटो शिवजयंतीचे मिळणार नाहीत हे आणखी एक सत्य आहे.
मुळात संघात कोणतीच जयंती अथवा पुण्यतिथी साजरी होत नाही. अगदी आद्य सरसंघचालक आणि संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची व दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांची देखील जयंती व पुण्यतिथी साजरी होत नाही.
हेडगेवार, गुरूजी या दोघांचेही प्रेरणास्थान राजे आहेत. म्हणूनच संघात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अनिवार्य आहे. हा विषय पुन्हा चर्चा करू. आधी महाराजांना अभिवादन हा विषय आपण बघूत.

संघात एका वर्षात अनेक उत्सव साजरे होतात ती कोणकोणती आहेत ती आधी समजून घेऊ. हे उत्सव संघात दरवर्षी नित्यनियमाने न चुकता साजरी होत असतात.

संघ शाखेवर ते थेट नागपूरपर्यंत सहा उत्सव दरवर्षी साजरे होत असतात. ती खालील प्रमाणे आहेत.
१) हिंदू नवर्षाचा पहिला उत्सव गुढी पाडवा
२) गुरूपोर्णीमा ( यात भगव्या ध्वजाला गुरूस्थानी समजून पुजन केले जाते. हेडगेवार अथवा गुरूजी नव्हे)
३) रक्षा बंधन उत्सव
४) मकर सक्रांती उत्सव
५) विजयादशमी उत्सव ( या दिवशी शस्त्र पुजन आणि संचलन होते)
आणि आणि शेवटचा उत्सव म्हणजे
६) हिंदू साम्राज्य दिन ( छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाचा दिवस)

महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला शिवाजी महाराजांच्या जन्माचा जेवढा अभिमान वाटतो तेवढाच अभिमान त्यांच्या स्वराज्याचे छत्रपती होण्याचा वाटतो. ज्या दिवशी राजांना छत्रपती ही उपाधी लागली आणि स्वराज्याचे संवैधानिक राजे झाले तो दिवस गौरवाचा आणि अभिमानाचा आहे. म्हणूनच हा गौरवशाली दिवस संघात मागच्या आठ दशकांपासून साजरा केला जातो. या दिवशी न चुकता जुन महिण्यात संघााच्या हजारो शाखांवर, नाागपूरच्या रेशीम बागेत साजरा होत असतो. महाराष्ट्राच्या राजाचे छत्रपती होणे केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात संघ साजरा करतो आहे. एकदाही खंड न पडता सलग ८५ वर्षापासून साजरा होत आहे. या दिवशी छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन तर केले जातेच पण त्यांच्या विचारांचा जागर देखील एकाचवेळी लाखो ठिकाणी संपूर्ण देशभर केला जातो. आसेतू हिमाचल पसरलेल्या या देशात कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत सगळ्या ठिकाणी जिथे जिथे म्हणून संघशाखा चालते तिथे तिथे छत्रपतींना अभिवादन केले जाते.
मुळात संघ विचाराचे बलस्थान आणि प्रेरणा हेच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि हिच आपल्या मराठी मातीत असलेली प्रेरणा देशभर संघ पोहचवत आहे.

संघाच्या प्रभात शाखांवर एक एकात्मता स्तोत्र सकाळी म्हटले जाते. यात देशातील वीर आणि पराक्रमी तसेच विद्वत जणाचे प्रातःस्मरण केले जाते. ही प्रक्रिया देखील मागच्या आठ दशकांपासून सुरू आहे. यात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख आहे.

मुसुनूरिनायकौ तौ प्रतापः शिव भूपतिः
रणजितसिंह इत्येते वीरा विख्यात विक्रमाः ॥२५॥

मुसून अरि नायक (प्रोलय नायक, कप्पा नायक), महाराणा प्रताप, छत्रपति शिवाजी, ( जे भूपती आहेत) महाराजा रणजीत सिंह आदि विख्यात वीर (आमच्यात बल संचार करोत)॥२५॥

संघ एवढ्यावरच थांबत नाही तर पुढे आणखी कांही लोकांचे स्मरण डॉ केशव बळीराम हेडगेवार व माधव गोळवलकर यांच्या आधी याच एकात्मता स्तोत्रात करत असतो. य़ा ओळी देखील माहितीसाठी येथे देत आहे.

सुभाषः प्रणवानंदः क्रांतिवीरो विनायकः
ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरुः ॥३०॥
संघशक्ति प्रणेतारौ केशवो माधवस्तथा
स्मरणीय सदैवैते नवचैतन्यदायकाः ॥३१॥

नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी प्रणवानंद, क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर,ठक्कर बप्पा, भीमराव आंबेडकर (डॉ. बाबासाहेब) महात्मा ज्योतीबा फुले, नारायण गुरू. संघ शक्तीचे सुत्र बांधणारे डॉ. केशव हेडगेवार, आणि माधव गोळवलकर ( यांची नावे शेवटी आहेत) यांचे सदैव स्मरण करणे नवचैतन्यदायक असते.
रोज सकाळी छत्रपती, फुले आ्रणि आंबेडकर यांना प्रातःस्मरणीय समजणारा संघ या विचारांचा तिरस्कार करणारा कसा असेल हा प्रश्न पडतो.

परत शिवजयंती या विषयावर येऊ.. आ्रजच्या काळात मागच्या दोन दशकात आग्रहाने शिवजयंती साजरी करणा-या संघटना अस्तित्वात देखील आल्या नव्हत्या तेव्हापासून संघ शिवराज्य अभिषेक हा दिवस साजरा करत आलेला आहे. संघाचे संस्थापक डॉ केशव हेडगेवार यांनी संघात १९२५ सालापासून शिवराज्य अभिषेक दिन साजरा करायला सुरूवात केली. त्याला आता तब्बल ९५ वर्षे होत आली आहेत.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या देशभराता तब्बल ५६ हजारांच्या पेक्षा अधिक शाखा आहेत. यात एक कोटीच्या आसपास स्वयंसेवक नियमित सहभागी होत असतात. या एक कोटी स्वयंसेवकांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह गुरूजी आणि आद्यसरसंघचालकांची प्रतिमा असते. दरवर्षी ५६ हजार ठिकाणी शिवराज्यअभिषेक दिन साजरा होत असतो. रोज सकाळी कोटी स्वयंसेवक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रातःस्मरण करतात. रोज संघ शाखेत जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा कोट्यावधी वेळेस दिल्या जातात. तरीही संघाची शिवाजी महाराज यांच्यावरची श्रध्दा संशयाच्या घे-यात घेणे एका व्यापक कटाचा भाग आहे असेच म्हणावे लागेल...


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.