चेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय

1 min read

चेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय

चेन्नई सुपर किंगने किंग्ज११ पंजाब विरुद्ध १४ चेंडू व १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

शारजा : चेन्नई सुपर किंगने किंग्ज११ पंजाब विरुद्ध १४ चेंडू व १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रत्येकी ५३ चेंडूत प्रत्येकी ११ चौकार ठोकत चेन्नईच्या सलामी जोडीने विजयाचे १७९ धावांचे आव्हान सहजगत्या पार केले.
प्रथम फलंदाजी करताना किंग्स११ पंजाबने २० षटकात १७८ धावा केल्या. यात कर्णधार के. एल. राहुलचा वाटा ५२ चेंडूत ६३ धावांचा तर मयंक अग्रवाल २६, मनदीप सिंग २७, पूरन ३३, मॅक्सवेल ११ व समद खानच्या १४ धावांच्या बळावर पुरेसे आव्हान उभे केले.
मात्र, चेन्नईच्या शेन वॉटसनने ५३ चेंडूत ११ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ८३ तर फाफ ड्यूप्लेसिसने ५३ चेंडूत ११ चौकार व एकमेव षटकाराच्या साह्याने नाबाद ८७ धावा टोलवून चेन्नईला १० गडी व १४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
या विजयाबरोबर चेन्नई गुण तालिकेत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर दाखल झाला...!