मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पणनच्या प्रधान सचिवांना आदेश, परभणीतल्या त्या बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळास स्थगिती.

1 min read

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पणनच्या प्रधान सचिवांना आदेश, परभणीतल्या त्या बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळास स्थगिती.

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष दिसण्याची चिन्हे आहेत.

सिध्देश्वर गिरी/परभणी: परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जिंतुर आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात राजीनामा अस्त्राचा वापर केला. आणि त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती सांगितली. यात मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊन, अपमानकारक वागणूक दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी पत्राद्वारे दिली होती. त्यानंतर जिंतूर आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती, या प्रशासकीय मंडळांना स्थगिती देण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पणन विभागाच्या सचिवांना या बाजार समितीच्या प्रशासक मंडळ निवडीस स्थगिती देण्याचे पत्र दिले आहे. जिंतूर व मानवत बाजार समितीच्या नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळास स्थगिती देण्यात आली असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आगामी काळात दिसण्याची चिन्हे आहेत. प्रशासकीय मंडळाच्या मुदतवाढीस स्थगिती दिल्याने खा.सजंय जाधव यांचे पारडे जड झाले असून, दरम्यान खा.जाधव यांनी राष्ट्रवादीच्या या प्रशासकीय मंडळास दुस-यांदा मुदतवाढीचा निर्णय देणे म्हणजे शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर घोर अन्याय आहे.
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन त्या विषयाच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली. शिंदे यांनी दखल घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांना जिंतूर व मानवत समितीवरील नेमलेल्या प्रशासक मंडळास स्थगिती द्यावी. अशी शिफारस दि.27 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदे यांच्या या पत्रावर जिंतूर व मानवत समितीवरील प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीबाबत तपासणी करावी.तोपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे,असे टिप्पणी करित पणनच्या प्रधान सचिवांना आदेश दिला आहे.