चिकनगुनिया, उपाय आणि लक्षणे

चिकनगुनिया, उपाय आणि लक्षणे

चिकनगुनिया या आाजाराचे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. कारण चिकनगुनिया झाल्यावर त्याचा त्रास एक ते दोन वर्ष होतो असे म्हणतात. चिकनगुनियामध्ये विचित्र अंगदुखी आणि भयंकर तापामुळे माणूस हैराण होतो. चिकनगुनिया म्हणजेच CHIKV व्हायरस संक्रमित डास चावल्यामुळे हा आजार होतो. चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार असला तरी तो संसर्गजन्य नक्कीच नाही. सद्या चिकनगुनियाचा संक्रमन सध्या वाढताणा दिसत आहे. पण जर या आजारापासून सुटका हवी असेल तर न घाबरता याचा सामना करायला हवा. शिवाय चिकनगुनियाची लक्षणे वेळीच ओळखता आणि योग्य उपचार घेतले तर यातून लवकर बरे देखील होता येते.

चिकनगुयाचे लक्षणे

अचानक ताप येणे
चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीला अचानक तीव्र ज्वर म्हणजेच ताप येतो. चिकनगुनियामध्ये एखाद्याला 102 डिग्री सेल्सिअस ते 104 डिग्री सेल्सिअस इतका ताप येऊ शकतो. काहींना या आजारात एक आठवडा तर काहींना त्यापेक्षा जास्त दिवस ताप येतो. त्यामुळे जर तुम्हाला खूप दिवसांपासून ताप येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या.

सांधे दुखी
चिकनगुनियाचे प्रमुख लक्षण (Chikungunya Symptoms In Marathi) आहे सांधेदुखी. या आजारपणात सांधेदुखी इतक्या तीव्र स्वरूपात असते की त्या व्यक्तीला त्याच्या हात अथवा पायांची हालचाल करणंही शक्य होत नाही. अचानक हात आणि पाय जड होतात आणि चालणे, उठणे, बसणे कठीण होते. चिकनगुनियामधून बरं झाल्यावरही काही महिने अथवा वर्ष, दोन वर्ष सांधेदुखी जाणवू शकते. यासाठी करा सांधेदुखीवर घरगुती उपाय

डोकेदुखी
चिकनगुनियामध्ये तापासोबत भयंकर डोकेदुखीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे रुग्णाला तापासह डोकेदुखीच्या असह्य वेदना सहन कराव्या लागतात. जर ताप आल्यावर तुमचे प्रचंड डोकं दुखत असेल तर हे चिकनगुनिया झाल्याचे हे एक प्रमुख लक्षण असू शकते. त्यामुळे असं जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखी घरगुती उपाय.

स्नायूंमध्ये वेदना जाणवणे
चिकनगुनियामध्ये प्रामुख्याने अंगदुखी आणि शरीरातील प्रत्येक स्नायूंमध्ये असह्य वेदना जाणवतात. अचानक हात अथवा पायाचे स्नायू दुखू लागतात आणि कोणतीही हालचाल करणे कठीण जाते. जर तुम्हाला तापामुळे उठणे, बसणे अथवा उभे राहण्यास त्रास होत असेल तर ते चिकनगुनिया लक्षण असू शकते.

पुरळ
चिकनगुनियाचे आणखी एक प्रमुख लक्षण म्हणजे या आजारात शरीरावर कोणत्याही भागावर पुरळ उठू शकते. कधी कधी औषधांचा दुष्परिणाम म्हणून अंगावर पुरळ, चट्टे अथवा लालसरपणा दिसतो. साधारणपणे हे लाल पुरळ अथवा चट्टे हाताचे तळवे, चेहरा आणि मांड्यावर येतात. मात्र असे झाल्यास घाबरू नका कारण हे एक सामान्य चिकनगुनियाचे लक्षण आहे. काही काळानंतर हे चट्टे आपोआप कमी होतात. जाणून घ्या पुरळ घरगुती उपाय, असे कमी करा अंगावरील रॅशेस.

सांध्यांना सूज येणे
सांधा हा शरीरातील असा एक भाग असतो ज्याठिकाणी दोन हाडे एकमेकांमध्ये बसवलेली असतात. शरीरात हात, पाय, गुडघा, कोपरा, मनगट, कंबर, हातापायाची बोटे अशा अनेक ठिकाणी सांधे असतात. या सांध्यामुळे हालचाल करणे सोपे होते. मात्र चिकनगुनियामध्ये सांध्यामध्ये सूज येते ज्यामुळे हालचाल करण्यास मर्यादा येतात.

आर्थ्राटीस
चिकनगुनियामध्ये निर्माण झालेली सांधेदुखी लवकर बरी झाली नाही तर त्याचे स्वरूप आर्थ्राटीसमध्ये होण्याची शक्यता असते. आर्थ्राटीस हा गंभीर स्वरूपाच्या सांधेदुखीचा आजार आहे. आर्थ्राटीस झाल्यास रुग्णाला सांध्यांच्या दुखण्यामुळे दैनंदिन कामे करणे देखील कठीण होते. त्यामुळे अचानक जाणवणाऱ्या सांधेदुखीचे नेमके कारण शोधा आणि त्यावर योग्य उपचार करा.

उलटी आणि मळमळ
चिकनगुनियामध्ये तापासह मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू शकतो. चिकनगुनिया झाल्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे डोकेदुखीसह मळमळ आणि उलटी होण्याची शक्यता असते. यासाठीच अशा रुग्णांना सतत पाणी पिण्याचा आणि शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे जर तुम्हाला ताप, डोकेदुखीसह उलटीचा त्रास होत असेल तर ते चिकनगुनियाचे एक लक्षण नक्कीच असू शकते.

या चिकनगुनिया आजारावर हे आहेत घरगुती उपचार

  • चिकनगुनियाच्या आजारात तुळशीची पाने फायदेशीर ठरतात. तुळशीची 5-6 पाने पाण्यात टाकून ते पाणी चांगले उकळवा. जेवणानंतर हे पाणी प्या. यामुळे ताप कमी होईल तसेच रोगप्रतिकारक्षमता वाढेल.

  • या आजारात नारळाचे पाणी पिणे उत्तम. हे पाणी प्यायल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

  • कच्चे गाजर खाल्ल्यास रोगप्रतिकारक्षमता वाढते. तापामुळे सांधे दुखत असल्यास त्याठिकाणी लसूणाची पेस्ट अथवा लवंगाचे तेल लावल्याने फायदा होतो.

  • चिकनगुनियाच्या आजारावत उत्तम औषध म्हणजे गायीच्या दुधासोबत द्राक्षे खाणे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.