१२ ते १८ वयोगटातील मुलांना लवकरच Zydus Cadila ची लस मिळणार- केंद्र सरकार

Zydus Cadila च्या ZyCoV-D लसीच्या वापराला परवानगी मिळाल्यास ती देशातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस असणार आहे.

१२ ते १८ वयोगटातील मुलांना लवकरच Zydus Cadila ची लस मिळणार- केंद्र सरकार

नवी दिल्लीः देशाातील १२ ते १८ वयोगटातील मुलांना Zydus Cadila ची लस देण्यात येणार आहे.असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितली आहे. 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी कोरोना लसीचे 186.6 कोटी डोस आवश्यक आहेत. Zydus Cadila ची ZyCoV-D ही लस जगातील पहिलीच डीएनए आधारित लस आहे. केंद्र सरकारणे या संमबंधी प्रतिज्ञापत्रक न्ययालयाला सादर केले आहे.

भारतातील अग्रगण्य औषध कंपनी असलेल्या Zydus Cadila कंपनीकडून त्याच्या ZyCoV-D या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) तशा प्रकारची विनंती करण्यात आली असून या लसीला मान्यता मिळाल्यास ती जगातील पहिली DNA आधारित लस असणार आहे. Zydus Cadila ची ZyCoV-D ही लस डीएनए आधारित असल्याने त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी
काल राज्याने ३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात ७ लाखांहून अधिक लस देण्याचा विक्रम

भारतात आतापर्यंत तीन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. Zydus Cadila च्या ZyCoV-D लसीच्या वापराला परवानगी मिळाल्यास ती देशातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस असणार आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची आकडेवारी तयार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी Zydus Cadila ने 28,000 स्वयंसेवकांचा वापर केला होता. त्याचा अहवाल आता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) जमा करण्यात आली आहे. ही लस 12 ते 18 वयोगटातील बालकांसाठीही उपयुक्त असेल असे सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ७ लाख ८८ हजार ८२५ जणांचे लसीकरण
काल एकूण २९ हजार ९३१ जणांनी लस घेतलr...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.