औरंगाबादेतून अपहरण केलेल्या चिमुकलीची जालन्यातून सुटका

सिडको एमआयडीसी पोलीसांची कामगिरी, आरोपी सासू-सुनेला अटक...

औरंगाबादेतून अपहरण केलेल्या चिमुकलीची जालन्यातून सुटका

औरंगाबाद : धूत हॉस्पिटल जवळील रस्त्यालगतच्या झोपडीत राहणाऱ्या कुटुंबातील एका ३ वर्षीय चिमुकलीचे रात्री झोपेत असताना अपहरण करुन जालन्यात घेऊन जाणाऱ्या सासू-सुनेला एमआयडीसी सिडको पोलीसांनी अटक केली आहे. वनमाला मुन्नालाल शर्मा(वय.५२) व राधा रवी शर्मा (वय.२७, दोघी रा.लालबाग झोपडपटटी, राजीवनगर, देऊळगांव राजा रोड, जालना) अशी अपहरण करणाऱ्या सासू-सुनेची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे, जालन्यातील राजीवनगर झोपडपट्टीत अवैध दारू विक्री करणारी वनमाला आणि तिची सून राधा शर्मा राहतात. राधाला चार मुले होते, त्यापैकी दोन मुलांचा मृत्यू झालेला आहे. वनमाला हिची सून राधाला मुलगी असावी अशी अपेक्षा होती. मात्र, तिला मुलेच झाली. त्यामुळे दोघींनी मिळून मुलीचे अपहरण करण्याचा डाव आखला. त्यासाठी त्या दोघीही रिक्षाने १२ ऑगस्ट रोजी जालना येथून औरंगाबादला आल्या. रात्री सव्वा बाराच्या सुमारास त्या धूत हॉस्पिटलजवळ पोचल्या.तिथे रस्त्यालगत अनेक मजूर मोलमजुरी करून कुटुंबियांसोबत झोपडीत राहतात. त्यातील एका झोपडीत झोपलेल्या तीन वर्षीय बालिकेचे रिक्षातून अपहरण करून जालन्याला नेले होते. मध्यरात्री आरोही झोपलेल्या जागेवर दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी तात्काळ बालिकेचा शोध घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
cidcom
त्यानंतर पोलीसांनी स्मार्ट सिटीच्या कॅमेरातून वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना काही धागेदोरे हाती लागले. त्यानुसार उपनिरीक्षक ए.डी.नागरे यांनी पथकासह थेट जालना गाठले. वनमाला आणि राधा शर्मा या सासू सुनेला शुक्रवारी दि.२० रोजी अटक करत, बालिकेची सुखरुप सुटका केली. व तीच्या कुटूंबाच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्यासह उपनिरीक्षक ए.डी.नागरे, मिरा लाड, गुन्हे शाखेचे पवन इंगळे, जमादार ओहळ, शिपाई काळे, दाभाडे व सुंदर्डे यांनी केली.

अपहरण करण्यात आलेली चिमुकली

पोलीसांच्या तत्परतेमुळे मिळाली चिमुकली
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तत्परतेने शोध घेत चिमुकलीची जालन्यातून सुटका केली. यामुळे तिच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

लग्नाचं आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार
छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.