अभिनेत्री नुसरत जहाँ हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन

बाळ आणि नुसरत या दोघांची प्रकृती ठीक आहे

अभिनेत्री नुसरत जहाँ हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन

नवी दिल्ली : टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. नुसरतने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, बाळ आणि नुसरत या दोघांची प्रकृती ठीक आहे. नुसरत यांना बुधवारी रात्री कोलकाताच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रसुतीची तारीख ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीची होती. मात्र लेबर पेनमुळे त्यांना २५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करावं लागलं.

नुसरत यांचं लग्न २०१९ मध्ये निखिल जैनशी झालं होतं. तुर्कीमध्ये दोघांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. काही मोजक्या व्यक्ती या लग्नाला उपस्थित होत्या. त्यानंतर भारतात त्यांनी जंगी सेलिब्रेशन करत रिसेप्शन दिलं होतं. त्यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. मात्र वर्षभरातच दोघांमध्ये विवाद सुरू झाले. विवादानंतर नुसरतने हे लग्नच अमान्य केलं होतं आणि आम्ही पती पत्नी नसल्याचं म्हटलं होतं. नुसरत यांनी हे लग्न बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचा हा वाद देशभरात रंगला होता.
gffghfh-4


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.