नवी दिल्ली : भारतातील १३५० संविधानिक पदावरील व्यक्तींच्या पाठोपाठ चीन भारतातील स्टार्टअप अँप्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांवरही नजर ठेवत असून पेमेंट अँप्स, सप्लाय चैन, डिलीवरी अँप्स आणि या अँप्सचे सीईओ-सीएफओसह जवळपास १४०० व्यक्ती आणि संस्थांवर पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे. चीन भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष ठेवून असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिले आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, चीनची नजर भारतीय रेल्वेत इंटर्नशिप करणाऱ्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासोबतच संपूर्ण स्पेक्ट्रमला व्यापणार्या कमीतकमी १४०० संस्थावरही आहे. एवढच नाहीतर चीन देशातील स्टार्टअप्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि भारतातील परदेशी गुंतवणूकदार आणि त्यांचे संस्थापक तसेच मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्यांवरही चीनची नजर आहे.
चीन भारतातील या गोष्टींवर नजर ठेवून आहे :
· पेमेंट अँप्स
· सप्लाई चैन
· डिलीवरी अँप्स
· टेक स्टार्टअप्स
· ट्रॅफिक अँप्स
· वेंटर कॅपिटल
· शहरी रहदारी
· डिजिटल हेल्थकेयर
· डिजिटल एज्युकेशन
या कंपन्यांच्या संस्थापक, CEO, CFO, CTO आणि COO यांच्यावर चीनची नजर
· टीके कुरियन- प्रेमजी इन्वेस्ट मधील मुख्य गुंतवणूक अधिकारी.
· अनीश शाह- ग्रुप सीएफओ, महिंद्रा ग्रुप.
· पीके एक्स थॉमस- सीटीओ, रिलायन्स ब्रँड.
· ब्रायन बाडे- मुख्य कार्यकारी, रिलायन्स रिटेल.
· विनीत सेखसरिया- कंट्री हेड, मॉर्गन स्टेनली.
· फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बंसल.
· झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल.
· स्विगीचे सह-संस्थापक आणि सीईओ नंदन रेड्डी.
· न्याकाचे सह-संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर.
· उबर इंडियाचे प्रमुख चालक संचालन पावन वैश्य.
· PayU चे चीफ नमित पोटनीस.