चित्रा वाघ यांनी फडणवीसांचे कौतुक करुन, सरकारवर साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस यांचा फोटो केला ट्वीट

चित्रा वाघ यांनी फडणवीसांचे कौतुक करुन, सरकारवर साधला निशाणा

मुंबईः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल आंबेघरमधील विस्थापित गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी फडणवीस आणि दरेकरांनी गावकऱ्यांसोबत जेवणही केले. फडणवीस आणि दरेकरांचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टिका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत फडणवीसांचे कौतुक केले आहे. तर ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'एकीकडे महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची जाहीर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचे बळ आणि सोबत असल्याचा विश्वास. खरंच चित्र खूप बोलकी असतात,' असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.