औरंगाबाद महापालिकेतच्या हद्दीत सिडको, वाळूज येणार

सिडको वाळूज महानगर येणार महापालिकेत!अभ्यासासाठी संयुक्त समिती

औरंगाबाद महापालिकेतच्या हद्दीत  सिडको, वाळूज येणार

औरंगाबाद : औरंगाबाद-महापालिकेची हद्दवाढ करण्यासाठी काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यात आता सिडको वाळूज महानगर प्रकल्प-१ मधील सोयी-सुविधांचा अभ्यास करण्यासाठी सिडको व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करुन ही समिती ४५ दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या हद्दवाढीविषयी चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेची पाच वर्षापूर्वी हद्दवाढ करण्यात आली होती. त्यावेळी सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला.बांधकाम व्यवसायिकांची संघटना क्रेडाईने वाळूज महानगरसह संपूर्ण परिसर महापालिकेत घेण्याची मागणी केली.

दरम्यान राज्य शासनाकडून पोलिस आयुक्तांच्या हद्दीपर्यंत महापालिकेची हद्द करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता. दरम्यान महापालिकेचे प्रशासक, तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला आहे. सिडकोने बजाजनगर भागात वाळूज महानगर-१ प्रकल्प पूर्ण केला आहे. दरम्यान नगर-१, नगर-२ व नगर-४ महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्याचा विचार केला जात आहे. सिडकोने नगर-१ व नगर-२ विकसित केले आहे. तसेच नगर-४ साठीचे क्षेत्र संपादीत केले आहे. त्यानुसार या भागातील रस्ते, खेळांची मैदाने, मोकळ्या जागा, जमीनी, जलनि:सारण योजना, विद्युत वाहिन्या, पथदिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, ईएसआर, जीएसआर, पंपगृहे, सभागृहे याची माहिती संकलीत करून त्याचे मूल्यांकन करणे तसेच या सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसह आवश्यकतेनुसार पुनर्विकास करण्यासाठी अपेक्षित ढोबळ खर्च काढणे या कामासाठी सिडको व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.