या देशातील नागरिकाला अदानी किंवा अंबानी व्हायचे नाही- संजय राऊत

मोदींनी आपल्या सात वर्षांच्या राजवटीचं आत्मपरीक्षण करून आपल्यात व देशात सुधारणा घडवून आणाव्यात

या देशातील नागरिकाला अदानी किंवा अंबानी व्हायचे नाही- संजय राऊत

मुंबई : मोदींच्या नव्हे तर कॉंग्रेसच्याच पुण्याईवर देश चालला आहे आणि कॉंग्रेसमुळेच आज देश तग धरूनराहिला आहे. मोदींनी आपल्या सात वर्षांच्या राजवटीचं आत्मपरीक्षण करून आपल्यात व देशात सुधारणा घडवून आणाव्यात, असे विधान शिवसेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊत यांनी केले आहे. केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली, त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पंडित नेहरूंपासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंत कॉंग्रेसी पंतप्रधानांनी या देशाची मूलभूत उभारणी केली. त्यांनी सुरू केलेल्या योजना आजही सुरू आहेत. त्यामुळे मोदी सरकारने आत्मचिंतन करून देशासाठी आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. देशातील अनेक प्रश्‍न गेल्या सात वर्षांत सुटू शकलेले नाहीत. आज मोदी सकार बिगर भाजपशासित राज्यांशी दुजाभावाने वागत आहे, असे नमूद करताना त्यांनी म्हटले आहे की, देशातील सर्वच राज्यांचे पालकत्व केंद्र सरकारच्या हातात आहे. त्यांनी आपल्या सर्वच अपत्त्यांना समान पद्धतीने वागवले पाहिजे.

या देशातील नागरिकाला अदानी किंवा अंबानी व्हायचे नाही, त्यांना फक्‍त त्यांचा रोजगार हवा आहे. त्यांना आरोग्य शिक्षण या क्षेत्रातील समस्या सुटलेल्या हव्या आहेत असं देखील राऊत म्हणाले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.