सोयाबीन बियाणे खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा

शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत पाहणे ही कर्नाटकातील पहिलीच वेळ...

सोयाबीन बियाणे खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा

एम.एस.हुलसूरकर/हुलसूर : येथुन जवळच असलेल्या भालकी तालुक्यातील आळवाई येथील घटना अशी की, शेतकरी संपर्क केंद्राकडून दि.६ रोजी रविवारी हलगी लावून दवंडी देण्यात आली होती. सोमवारी सकाळी लवकर शेतकरी संपर्क केंद्रात सोयाबीन बियाणे देण्यात येणार आहे. हे बियाणे मिळविण्यासाठी नागरिक रविवारी रात्री ८ वाजल्यापासून सरकारी शाळेत उतरवलेल्या शाळेच्या आवारात महिला-पुरुष सुमारे १०० ते १५० एकत्र रांग लावून सकाळी शेतकरी संपर्क केंद्र उघडण्याची वाट रात्रभर पाहत बसले.

शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत पाहणे ही कर्नाटकातील पहिलीच वेळ, असे नागरिक बोलत होते काही शेतकरी अशा चिंतेत होते की रात्री जर नाही थांबलो तर सोयाबीन बियाणे मिळनार नाही. आणि बियाणे मिळाले नाही तर पेरणी करायची कशी व मुला बाळांला खायला घालायचे काय, अशा चिंतेत महिला नागरिक थांबले होते. गावातील सुजाण अथवा ग्रामपंचायत सदस्य व नेते हे सर्व पाहून मुग गिळून गप्प का बसले होते. असा प्रश्न गावातील लोक विचारत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.