नागरिकांनी आजार अंगावर काढू नये-सीईओ टाकसाळे

लसीकरण आणि रक्तदानासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उस्फूर्तपणे समोरे यावे

नागरिकांनी आजार अंगावर काढू नये-सीईओ टाकसाळे

परभणी: नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीसारखे आजार अंगावर न काढता तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.

शनिवार १७ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने पूर्णा येथील बुद्ध विहारामध्ये रक्तदान शिबिर व कोविड - 19 लसीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला नागरिकांसाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. लसीकरण आणि रक्तदान शिबिर कार्यक्रम १८ एप्रिल रोजीही सुरू असल्याची माहिती संयोजन समितीने दिली आहे. यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, भदंत उपगुप्त महाथेरो, डॉ. विनय बगाटे, डॉ. विनय वाघमारे, मा. नगराध्यक्ष मोहन मोरे, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, गटविकास अधिकारी अमित राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप काळे, प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, मंचक खंदारे, अशोक कांबळे दिलीप गायकवाड राजकुमार सूर्यवंशी सुभाष पाडवीर आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना टाकसाळे म्हणाले की लसीकरण आणि रक्तदानासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उस्फूर्तपणे समोरे यावे. कोरोना बाबतची कुठलीही लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधून योग्य ते उपचार घ्यावेत. तसेच जिल्ह्यातील 45 वर्षापेक्षा वरच्या वयोगटातील नागरिकांनी न चुकता लसीकरण करून घ्यावे यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊ शकेल. तसेच नागरिकांनी भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाशी समरूप आयुष्य जगण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी टाकसाळे यांनी केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.