औरंगाबादमध्ये आजपासून 'या' पाच मार्गांवर धावणार सिटी बस

स्मार्ट सिटी बससेवा पुन्हा शहरवासियांच्या सेवेत रुजु...

औरंगाबादमध्ये आजपासून 'या' पाच मार्गांवर धावणार सिटी बस

औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आलेली स्मार्ट सिटी बससेवा आजपासुन पुन्हा धावणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच मार्गावर १६ बस धावणार असल्याचे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या शहर बस विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

टप्प्या-टप्प्याने बससेवा सुरू केली जाणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून सिडकोबस्थानकावरून पाच मार्गावर १६ बस धावतील. बसच्या २४१ फेऱ्या होतील. सर्व बसेस निर्जंतुक केलेल्या असतील. प्रवास करताना मास्क, सेनिटायझर वापरणे व शासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यातील बस सुरू केल्या जाणार असल्याचे शहर बस विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात या ५ मार्गांवर धावतील बस
मार्ग क्रमांक- ४
सिडको ते रेल्वे स्टेशन
मार्गे - टीव्ही सेंटर

मार्ग क्रमांक-५
औरंगपुरा ते रांजणगाव
मार्गे-मध्यवर्ती बस स्थानक

मार्ग क्रमांक- १०
औरंगपुरा ते छत्रपती शिवाजी नगर
मार्गे - महावीर चौक, ७ हिल

मार्ग क्रमांक- १२
सिडको ते घाणेगाव
मार्गे-रांजणगाव, मायलन कंपनी

मार्ग क्रमांक- १३
सिडको ते जोगेश्वरी
मार्गे - रांजणगाव

फिल्मीस्टाईल पाठलाग करुन पोलीसांनी पकडला ३७ किलो गांजा
आंध्रातून शहरात विक्रीसाठी आणत होते गांजा, औरंगाबाद शहर गुन्हे शाखेने पाठलाग करुन पकडले आरोपी...
देशाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
कोरोना बांधितीचा आकडा लाखाहून खाली घसरलेला दिसतोय...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.