कोरोनामुक्त गावांच्या सरपंचांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर आणि शिंगोली ही दोन गावे शंभर टक्के कोरोनामुक्त झाली, या पार्श्वभुमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल रोजी गावरक-यांशी संवाद साधला.

कोरोनामुक्त गावांच्या सरपंचांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

मुंबईः राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती रुग्णसंख्या बघता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनामुक्त गावची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच शासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडुन कोरोनामुक्त गावांना अनेक पुरस्कारही दिले जात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर आणि शिंगोली ही दोन गावे शंभर टक्के कोरोनामुक्त झाली, याच पार्श्वभुमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल (11 जून) रोजी गावरक-यांशी संवाद साधला.

शिंगोली आणि तेर ही गावे कोरोनामुक्त करण्यासाठी गावक-यांनी सर्व नियमांचे पालन केले, असे गावच्या सरपंचांनी मुख्यमंत्र्याना सांगितले. "यावेळी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सरपंच उत्तम काम करत आहेत, गावात कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी वारली, वाघ्या मुरळी, वासुदेव यांची देखिल मदत घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही हे कोरोनाना नाही तर आपण ठरवायचे आहे. आपण सर्वांनी ठऱवले तर तो गावात येणार नाही असं सांगुन त्यांनी गावातील लोकांना प्रोत्साहन दिले. गावात सर्वांनी लस घ्यावी यासाठी सरपंचांनी स्वतः पुढाकार घेत प्रथम लस घेतली त्यामुळे गावकरीही लस घेण्यास तयार झाले. गावक-यांच्या आरोग्यासाठी सरपंचांनी घेतलेला पुढाकार खरोखरच प्रशंसनीयच आहे,' अशा शब्दांत त्यांना सर्व सरपंचांचे कौतुक केले.

यावेळी शिंगोलीचे सरपंच येडबा शितोळेे आणि तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी यांनी सांगितले की, 'आमची गावे शहरापासुन जवळ असल्याने शहरातुन गावात येणा-या तसेच गावातुन शहरात जाणा-या प्रत्येक व्यक्तिची आम्ही तपासणी केली. त्यात जे लोक पॉझिटीव आले त्यांच्या घराजवळ आम्ही पुढचे दहा दिवस कोणालाही जाऊ दिले नाही. यामुळेच गाव शंभरटक्के कोरोनामुक्त करण्यास आम्हाला यश आले', असे त्यांनी सांगितले.

या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, शिंगोलीचे सरपंच येडबा शितोळे, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड आदि लोक उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.