मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांना व्हॉट्सअपवर धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी.

मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांना व्हॉट्सअपवर धमकी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना धमकी दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तिनं धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.या अज्ञात व्यक्तीने काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी देण्यात आली आहे.नार्वेकर यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत.

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. दोनच दिवसांपुर्वी अतिरिक्त मुख्य सचिवांना शरद पवारांच्या नावे बदली करता धमकी देण्यात आली होती. ते प्रकरण ताजे असतानाच आता मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आलीये. या प्रकरणात आता पुढे नेमकी काय पावले उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.