खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या हत्येचा कट, शिवसेनेचा निषेध.

1 min read

खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या हत्येचा कट, शिवसेनेचा निषेध.

खासदार बंडू जाधव व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ झेड सुरक्षा पुरविण्यात यावी.

सिद्धेश्वर गिरी /परभणी: परभणी जिल्ह्याचे  खासदार संजय(बंडू)जाधव यांना  जीवे मारण्याचा कट तसेच धमकी दिल्याच्या तक्रारी वरून परभणी येथे  गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत सोनपेठ शिवसेनेच्या वतीने सोनपेठ पोलीस प्रशासनाला एक निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे .
परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार बंडू जाधव यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा कट असल्याची माहीती मिळताच खा.जाधव यांनी पोलिसांना तक्रार देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
याप्रकरणी सोनपेठ शिवसेनेच्या वतीने दि.२८ रोजी पोलीस अधीक्षक परभणी यांना पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्फत  निवेदन देऊन खासदार जाधव यांच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या गुंडां विरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच नांदेड जिल्ह्यात वाढत्या गुंडगिरीवर आळा बसवून याप्रकरणात असणाऱ्या मूळ सुत्रधारास तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खासदार बंडू जाधव व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ झेड सुरक्षा देखील पुरविण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे,तालुका समन्वयक रंगनाथ रोडे,शहरप्रमुख कृष्णा पिंगळे,युवासेना शहरप्रमुख अमोल दहिवाळ,भगवान पायघन,कुमार चव्हाण,जनार्धन झिरपे,राम कदम,गणेश जोशी,संतोष गवळी,रुस्तुम कलिंदर,बालाजी शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.