एनालयाझरच्या बातमीचा इफेक्ट बिदरचे जिल्हाधिकारी आर. रामचंद्रन यांची जमखंडी पुलाला भेट.

1 min read

एनालयाझरच्या बातमीचा इफेक्ट बिदरचे जिल्हाधिकारी आर. रामचंद्रन यांची जमखंडी पुलाला भेट.

कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र या चार राज्यांंना जोडणारा निजामकालीन पुलाची दुरावस्था झाली असून गेल्या आठवड्यात नदीच्या पात्रात फसलेला मालवाहक ट्रक वाहून जाण्याची दुर्घटना घडली.

बिदरचे जिल्हाधिकारी आर. रामचंद्रन यांनी जमखंडी पुलाला भेट देऊन पुलाच्या दुरावस्थेची पाहणी करून पुलाच्या कामाचे आदेश दिले. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र या चार राज्यांंना जोडणारा निजामकालीन पुलाची दुरावस्था झाली असून गेल्या आठवड्यात नदीच्या पात्रात फसलेला मालवाहक ट्रक वाहून जाण्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रामचंद्रन यांनी जमखंडीस भेट देऊन जर्जरावस्थेतील पुलाची पाहणी करून तात्काळ नवा पूल उभारण्याचे तसेच पर्यायी पुलाच्या डागडुजीसह सुरक्षितेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केल्या.
यावेळी तहसीलदार सावित्री सरगर, बिदर जि. प. चे माजी अध्यक्ष अनिल भुसारे, माजी उपाध्यक्ष लता हारकुडे, जि. प. सदस्य सुधीर काडादी, पं. स. सदस्य गोविंद सोमवंशी, पीएसआय गौतम यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.