कॉमेडीयन भारती सिंहला अटक

1 min read

कॉमेडीयन भारती सिंहला अटक

NCB ची मोठी कारवाई, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे.

मुंबई/श्वेता भेंडरकर : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीया याची गेल्या पाच तासांपासून चौकशी सुरु आहे.  कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाला एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास  भारतीला अटक करण्यात आली आहे. या दोघांना NCB ने आधी  समन्स बजावले होते. NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतलं.

मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे तर तिचा नवरा हर्षची चौकशी सुरु आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी आणखी एका ड्रग्ज तस्कराला वर्सोवा-अंधेरी भागातून अटक करण्यात आली आहे.
गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीने हर्ष-भारतीच्या घरावर छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.