दिलासादायक! राज्यात कोरोना रूग्ण संख्येत घट

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के आहे.

दिलासादायक! राज्यात  कोरोना रूग्ण संख्येत घट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासात ३ हजार १८७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार २५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. काल दिवसभरात ४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.

राज्यात सध्या ३८ हजार ६७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात २,५२,३०९ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर १,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५, ८५, ८४, ८१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४७, ७९३ (११.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

अॅक्टिव्ह रूग्ण संख्या

पुणे - ९, २८०
जळगाव -०९
नंदूरबार - ०६
धुळे -०२
जालना -४५
परभणी -५८
हिंगोली -१७
नांदेड १२
अकोला -२९
वाशिम ०९
बुलढाणा- ०१
यवतमाळ -०६
वर्धा-०६
भंडारा -०२
गोंदिया -०४
चंद्रपूर- ९४
गडचिरोली -१९


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.