शाळेतून घरी येताच, त्याचे होते वेगळ्या स्टाईलमध्ये स्वागत...

1 min read

शाळेतून घरी येताच, त्याचे होते वेगळ्या स्टाईलमध्ये स्वागत...

छोटा भाऊ शाळेतून घरी येतो तेव्हा, त्याचा मोठा भाऊ, वेगळा पोशाख परिधान करून, बसस्थानकात त्याचे स्वागत करतो.

अमेरिकेच्या लुझियाना मधील दोन भाऊ सध्या सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय होत आहेत. खरं तर, दररोज छोटा भाऊ शाळेतून घरी येतो तेव्हा, त्याचा मोठा भाऊ, वेगळा पोशाख परिधान करून, बसस्थानकात त्याचे स्वागत करतो. वेगवेगळ्या पोशाखात त्यांचे स्वागत करण्याची शैली लोकांना पसंत पडली, यामुळे या दोन भावांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका वृत्तानुसार, १७ वर्षीय मोठा भाऊ नोआ टिंगले हा हायस्कूलचा विद्यार्थी आहे. जेव्हापासून त्याचा धाकटा भाऊ मॅक्स याची शाळा ऑगस्ट महिन्यापासून उघडली आहे तेव्हापासून तो आपल्या १२ वर्षाच्या लहान भावाला दररोज शाळेतून घरी येताना वेगवेगळे पोशाख परिधान करून त्याचे स्वागत करतो.

सर्वप्रथम त्याने सांताक्लॉजचा पोशाख परिधान करून मॅक्सचे स्वागत केले. त्यानंतर, वेगवेगळ्या दिवसात बॅटमॅन, व्हेयर्स वाल्डो, शेवबाक्का अशा १६ पोशाखात त्याचे स्वागत करण्यात आले.

नोआ म्हणाली की, सुरुवातीला तिच्या भावासाठी ही लाजिरवाणी गोष्ट होती. परंतु हे त्या दोघांसाठी अविस्मरणीय क्षण होते. असे करण्यामागचा त्याचा मुख्य हेतू म्हणजे तो पुढच्या वर्षी महाविद्यालयात जाईल ज्यामुळे त्याला आपल्या धाकट्या भावाला रोज भेटण्याची संधी मिळणार नाही त्यामुळे त्याला असे काही करण्याची भन्नाट कल्पना सुचली की, यामुळे दोन्ही भावांमधील नाते अजूनच मजबूत होईल.

सुरुवातीला, मॅक्सला आपल्या भावाच्या या कल्पनेची लाज वाटली, परंतु आता असे काही त्याला वाटत नाही. आपल्या भावाची ही अनोखी शैली चांगली असल्याचे त्याला वाटते.