स्वप्नील कुमावत/ शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद आता शिगेला गेला आहे. मुंबई महानगरपालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. कंगनानं एक ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली आहे.
मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं, त्यावेळी ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जात आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

