शहरातील नालेसफाई करुन गुणवत्तापुर्ण व जलदगतीने पुलाचे बांधकाम पुर्ण करा- खा.जलील

खासदार इम्तियाज जलील यांनी केली स्थळ पाहणी; व्यापाऱ्यांनी मांडल्या व्यथा, अधिकाऱ्यांची उपस्थिती ...

शहरातील नालेसफाई करुन गुणवत्तापुर्ण व जलदगतीने पुलाचे बांधकाम पुर्ण करा- खा.जलील

औरंगाबाद : दलालवाडी येथील औषधी भवन समोरील नाल्यावरती पुल बांधण्याचे काम संथगतीने सुरु असुन नालेसफाई होवुनच पुल बांधण्यात यावे. अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांनी व स्थानिक नागरीकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी औषधी भवन, दलालवाडी येथे होत असलेल्या पुल बांधकामाची स्थळ पाहणी करुन व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणुन घेतल्या. सदरील नालेसफाई करुनच गुणवत्तापुर्ण व जलदगतीने पुल बांधण्याच्या सुचना उपस्थित औरंगाबाद महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

तीनशे हुन अधिक व्यापारी सदरील परिसरातील हजारो स्थानिक नागरीकांना दुर्गंधी व घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. काम कासवगतीने होत असुन वाहतुकीस सुध्दा अनेक अडथळे निर्माण होत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी नालेसफाई न करताच पुलाच्या बांधकामात हलगर्जीपणा, दिरंगाई अथवा काम निकृष्ट दर्जाचे केल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पाहणी दरम्यान स्थानिक रहिवासी अजय चावरीया व रमेश पाटील यांनी दरवर्षी पावसाळ्यात औरंगाबाद शहरातील सर्व नाल्यांचे महानगरपालिकेच्या वतीने नालेसफाईचे काम युध्दस्तरावर हाती घेण्यात येते, परंतु औषधी भवनाच्या खाली असलेल्या नाल्याचे सफाई अनेक वर्षापासुन करण्यात आली नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील नागरीकांच्या घरात सांडपाणी जाऊन घरातील संपुर्ण घरगुती सामान पावसात वाहुन गेल्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निदर्शनास आणुन दिले. दरवर्षी स्थानिक नागरीकांना आर्थिक नुकसान होवुन, आरोग्याचा धोका निर्माण झालेला असून मरणयातना भोगावे लागत असल्याचे समस्त नागरीकांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमक्ष खा इम्तियाज जलील यांच्याकडे तक्रार केली.

तसेच व्यापाऱ्यांनी त्यांच्या संपुर्ण व्यथा मांडून व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्या व अडचणींची सविस्तर माहिती दिली. सदरील नाल्यात वर्षानुवर्षे असलेली घाण तसेच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात पाणी जाण्यास कोणताही इतरत्र मार्ग नसल्याने पुर परिस्थिती निर्माण होवून औषधी भवन, दलालवाडी, गोमटेश मार्केट, खोकडपूरा, औरंगपूरा, गांधीनगर समवेत इतर वसाहतीतील ५० ते ७० हजार नागरीक प्रभावित होणार असुन नाल्याचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी दुकानात व घरात शिरुन कोट्यावधींचा आर्थिक नुकसान होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेवून खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निविदेत नमुद केलेल्या विहित वेळेत संपुर्ण नालेसफाई करुनच तांत्रिकदृष्ट्या नियोजनबध्द, गुणवत्तापुर्ण व जलदगतीने पुलाचे बांधकाम पुर्ण करण्याचे सुचना महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांना केल्या.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.