रॅपिड अँन्टीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन

कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन् परिस्थितीचा विचार करून रॅपिड अँन्टिजन चाचणीचे आयोजन करण्यात आले...

रॅपिड अँन्टीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन

परभणीः शहर व जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. शनिवार ही संख्या ७० पर्यंत पोहोचली होती. शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातही ७ दिवसांची संचारबंदी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणी शहरात कोरोना बाधीतांच्या तपासणीसाठी रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट कॅम्पचे आयोजन केले आहे.

शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय, कल्याण मंडप शेजारी मनपा हॉस्पिटल, इनायत नगर तसेच हॉटेल मंजिरी जवळील आरोग्य केंद्रावर या कॅम्पचे आयोजन केले आहे. कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून नागरी भागात कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वाढता कोरोनाचा संसर्ग व प्रसार पाहता जिल्ह्यातील व्यापारी व नागरिकांनी रॅपिड अँन्टिजन चाचणी त्या-त्या केंद्रावर जाऊन करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.