चरस, गांजासह पिस्टल आणि काडतूसे जप्त

पोलिसांची मोठी कारवाई, तीन आरोपी ताब्यात...

चरस, गांजासह पिस्टल आणि काडतूसे जप्त

परभणी : परभणी पोलीस दलाच्या इतिहासात आजपर्यंत केलेल्या असंख्य कारवायांमध्ये पहिल्यांदाच चरस सारखे अंमली पदार्थ जप्त करण्याची कारवाई मंगळवारी पोलीस दलाकडून करण्यात आली आहे. या कारवाईत तीन आरोपींकडून चरस, गांजासह गावठी पिस्टल आणि काडतूस व अन्य हत्यार जप्त करण्यात आले आहेत.

मागील महिनाभरापासून यातील आरोपींवर विशेष पथकांकडून पाळत ठेवण्यात येत होती. या कारवाईत परभणी पोलिसांनी ६० हजार रूपयांचा ३११ ग्रॅम चरस, ५ हजार रूपयांचा ५०० ग्रॅम गांजा, दोन गावठी पिस्टल, १३ जिवंत काडतूसे, एक बुलेट, एक कार असा एकूण ६ लाख ४१ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील साखला प्लॉट परिसरातील काही व्यक्तींकडून अंमलीपदार्थ व पिस्टलसारख्या हत्यारांची विक्री होत असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली. या माहितीनंतर सदर भागात पोलिसांनी पाळत ठेवून मंगळवारी सापळा लावला. या कारवाईत साखला प्लॉट परिसरातील शेख सोनू उर्फ शेख अमीर शेख ताहेर याच्याकडे सदर माल विक्रीसाठी अन्य राज्यातून येत असून तो विक्रीचे काम करीत असल्याचे कळाले. त्यानंतर शेख सोनूसह अन्य दोघांना ताब्यात घेवून याबाबत चौकशी केली. त्यानंतर एक कार, आणि बुलेटच्या डिक्कीतून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, गुलाब बाचेवाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, संतोष सिरसेवाड, विश्वास खोले, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुय्यड, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, हनुमंत जक्केवाड, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, बबन शिंदे, शंकर गायकवाड, अझहर पटेल, हरिचंद्र खुपसे, दिलावर खान पठाण, दीपक मुदीराज, यशवंत वाघमारे, सय्यद मोबीन, शेख अझहर जाफर, संतोष सानप, संजय घुगे, छगन सोनवणे, अरूण कांबळे, विष्णू भिसे, आशा सावंत, उमा पाटील यांच्या पथकाने केली.

दरम्यान, परभणी पोलीस दलाने केलेल्या कारवाईनंतर मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे आणखी काही पिस्तूल व अंमली पदार्थ आहेत का? याची पडताळणी केली जात आहे. याचबरोबर सदर प्रकरणातील अन्य आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके अन्य राज्यात रवाना करण्यात आली आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.