रामाच्या नावाने पुन्हा एकदा गोंधळ..

राम म्हणजे देशातील करोडो हिंदुंचं श्रद्धास्थान. या आस्थेवर घाला घातला की तो चिडतो, व्यक्त होतो आणि व्यक्त झाला, की तो कसा हिंस्त्र आहे, हे सिद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतं. म्हणुन सोपा उपाय, रामाच्या नावाने गोंधळ घालायला सुरुवात करायची.

रामाच्या नावाने पुन्हा एकदा गोंधळ..

उत्तर प्रदेशः देशात रामाच्या नावाने गोंधळ घालायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. राम म्हणजे देशातील करोडो हिंदुंचं श्रद्धास्थान. या आस्थेवर घाला घातला की तो चिडतो, व्यक्त होतो आणि व्यक्त झाला, की तो कसा हिंस्त्र आहे, हे सिद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतं. म्हणुन सोपा उपाय, रामाच्या नावाने गोंधळ घालायला सुरुवात करायची. मुळात हिंदु सहन करतो म्हणुन हे सगळं घडत आहे.

प्रामुख्याने उत्तर प्रदेशात अशा पद्धतीच्या घटनांची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसते. काही दिवसांपूर्वीच राममंदिर न्यासाच्या जमिनीचा विषय पुढे आणला गेला आणि न्यासाच्या कामावर शंका व्यक्त केली गेली. पुढे हा घोटाळा नसल्याचं सिद्ध झालं. याला घोटाळा समजण्यात आलं, तसं दाखविण्यात आलं आणि एका वेगळ्याच गोंधळाला सुरुवात झाली. खोटे आरोप करायचे, काहितरी वेगळं सांगायच आणि राळ उडवुन द्यायची.

मध्ये एकदा तरबेज अन्सारीला झालेली मारहाण, हिंदुंनी केली असं सांगण्यात आलं. त्यानंतर आणखी एक प्रकरण गाझीयाबाद जवळ घडलं, अब्दुल समथ नावाच्या एका वयोवृद्ध मुस्लिम गृहस्थाला काही तरुणांनी मारल्याचा व्हिडीओ प्रसृत करण्यात आला. प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आवाजाशिवाय होता. दोन-चार तरुण त्या व्यक्तिला मारहाण करताना, त्याची दाढी कापताना त्यात दिसत होते. पुढे त्याच वयोवृद्ध गृहस्थाला घेऊन एका व्यक्तिने फेसबुक लाईव्ह केलं. या लाईव्हमध्ये त्या गृहस्थाने सांगितलं की, मला 'जय श्री राम' म्हणायला लावलं आणि मारहाण केली. उमेद पेहेलवान ईद्रीस नावाच्या व्यक्तिने हे फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यात त्याने वयोवृद्ध गृहस्थाची दुःखद कहाणी सांगितली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक जण पेटुन उठले आणि त्यावर भाष्य करु लागले. स्वरा भास्कर सारख्या व्यक्तिला तर अशा वेळी संधीच मिळते. हिंदु असल्याची लाज वाटत असल्याचं ट्विट तिने केलं. 'द वायर' सारख्या वामपंथी माध्यमांना यातुन संधी मिळाली आणि वायरने हिंदु कसा आक्रमक आहे, हे सांगुन टाकलं. त्यातच उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांची, त्यांच्या भाषेत अजय बिष्टांची सत्ता आहे. त्यांच्यासारखा व्यक्ती मुख्यमंत्री असल्यावर हिंदुंना लक्ष्य करण्याची संधी कोणी सोडेल, असं होणार नाही. सगळ्या वामपंथीयांनी, समाजवाद्यांनी योगी आदित्यनाथ, राम, राममंदिर, मोदी यांच्यावर टिकेचा आसूड ओढुन टाकला आणि हिंदु कसा आक्रमक आहे, हे सांगण्यास सुरुवात केली.

परंतु उत्तर प्रदेश पोलीसांनी यामागील सत्य बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यातुन जे वास्तव समोर आलं ते भयानक आहे. 'आवाज नसलेल्या या व्हीडीयोमध्ये त्या व्यक्तिला जय श्री राम म्हणायला लावून मारहाण करण्यात आली' असा दावा करण्यात आला होता. मात्र पोलीसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची नावं समोर आली. "आरेफ आदिल कल्लु आणि मुशाहिर"या नावांचे हे तरुण, हिंदु नाही तर मुस्लिम होते. त्यांनी ती मारहाण केली होती.

अब्दुल हा तावीज बनवुन देण्याचं काम करत होता. त्याने परवेज नावाच्या एका व्यक्तीला तावीज बनवून दिलं होतं. या तावीजचा खरोखर परीणाम होतो की नाही हे स्पष्ट नसलं, तरी "हे तावीज बांधल्याने आपल्या बायकोचा गर्भपात झाला आणि यासाठी अब्दुल जाबाबदार आहे" असं परवेजने म्हंटलं. यातुनच मारामारीला सुरुवात झाली. अब्दुलला दूर नेण्यात आलं, त्याची दाढी कापण्यात आली आणि त्याला सोडून दिलं गेलं. मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल केला गेला आणि ज्या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करुन त्याची व्यथा मांडली तो उमेद पेहेलवान ईद्रीस, समाजवादी पक्षाचा नेता आहे. अखिलेश यादव यांच्यसोबत सातत्याने असणा-या ईद्रीसने या गोष्टीला एक वेगळंच रुप दिलं. यासंदर्भात उत्तर प्रदेश पोलीसांनी प्रतिक्रीया दिली आहे.

मुळात हा वाद केवळ दोन व्यक्तींच्या मधला होता. त्याला हिंदु-मुस्लिम करुन मांडण्यात आलंं. हा व्हिडीओ व्हायरल करणा-या प्रत्येक माध्यम, व्यक्तींविरुद्ध चुकीची माहिती देणे, अफवा पसरवणे, शांतता धोक्यात येईल असं कृत्य करणे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या इंस्टाग्रामवर काही असे अकांऊंट्स आहेत त्यात हिंदु देवी-देवतांविषयी अत्यंत गलिच्छ पोस्ट करण्यात येतात. हिंदु शांत असतो, तो प्रतिक्रीयावादी असत नाही म्हणुन अशा पद्धतीची वक्तव्य सहन केली जातात. अशा स्वरुपाच्या पोस्ट एखाद्या अन्य धर्माविषयी केल्या असत्या तर काय झालं असतं? राम मंदिराचा मुद्दा देखिल असाच रेटला गेला. हिंदुंमध्ये आपल्या श्रद्धास्थानाविषयी संशय निर्माण व्हावा, तो भयभीत व्हावा हाच यामागचा उद्देश. हिंदुंची त्यांच्या श्रद्धास्थानावरील श्रद्धा कमी व्हावी, त्यांच्यात फुट पडवी, ज्यामुळे लगेच इतरांना त्यात बाेलण्याची संधी मिळेल. केवळ राजकारण करण्यासाठी, मतं मिळविण्यासाठी अशा पद्धतीने बदनामी केली जाते. मंदिरात चोरी करण्यसाठी आलेल्या चोराला मारहाण केली म्हणुन हिंदु आक्रमक आहेत असे आरोप या देशात केले जातात. फरीदाबादच्या प्रकरणातही हेच झालं, सुदैवाने पोलीसांना आवाज असणारा व्हिडीओ सापडला आणि त्यात 'जय श्री राम असा उल्लेखच नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.' अशा घटना झाल्यानंतर त्या करणा-या व्यक्तीचा राग येत नाही, कारण ते मूर्खच असतात. परंतु हिंदु असूनही या गोष्टी सहन करणा-या आणि आपल्याच धर्माला बदनाम करणारे व्हिडीओ शेअर करुन त्याविषयी भाष्य करणा-या लोकांचा अधिक राग येतो.

या गोष्टींविरुद्ध संवैधानिक मार्गांनी आपल्याला नक्कीच लढता येईल. अशा पद्धतीने बदनामी करणारे अकाऊंट आपण रिपोर्ट करु शकतो, शिवाय पोलीस ठाण्यात त्याची तक्रार देखिल करु शकतो. वकील सुद्धा यावर बंदी आणण्याचा प्रयत्न करु शकतात. हे करणं आता आवश्यक आहे कारण अशा पद्धतीचे आघात वारंवार होतील. दुष्टांची संख्या कमी करण्यासाठी आता कृष्ण अवतार घेणार नाहीत, तर आपल्यालाच स्वतःमधील ईश्वरी शक्ती ओळखुन हे करावं लागणार आहे. तरच हिंदु धर्माला सन्मानाने जगता येईल. आपण कधीही दुस-यांवर आघात करणारे नाही तर दुर-यांचा सन्मान करणारे आहोत. हा सन्मान परत मिळवण्यासाठी आपल्यातील प्रत्येकाने आता उभं रहाणं गरजेचं आहे.  


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.