जागतिक महिला दिना निमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्या

महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच, तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊ या असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

जागतिक महिला दिना निमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्या

मुंबईः आज जागतिक महिला दिना निमित्या स्त्रि शक्तिचे मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभेच्या दिल्या . तसेच करोनाच्या संकट काळात घराघरातील स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला. कठीण काळात न डगमगता सगळ्यांना सावरले. कोविड योद्धा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या. या लढ्यातील त्यांचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तमाम स्त्रीशक्ती, मातृशक्तीला शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच, तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊ या असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मागील वर्षी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्राद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यंदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संदेश दिला आहे. हा दिन महिलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा किंवा कर्तव्याचा भाग म्हणून नाही. आपण जे काही आहोत, त्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात धैर्याने साथ सोबत करणाऱ्या शक्तीला वंदन करण्याचा दिन आहे. महाराष्ट्राला शूर, कर्तबगार, समाजसुधारक, विचारवंत महिलांची मोठी परंपरा आहे. त्यामध्ये माँसाहेब जिजाऊ महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, ताराराणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्यासह अनेकांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करावे लागेल, त्यांना या निमित्ताने वंदन करावे लागेल. पण त्यांचा वारसा चालवणाऱ्या आताच्या काळातील महिलांनाही वंदन करावे लागेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिला दिन का साजरा केला जातो?

महिला दिन साजरा करण्याची परंपरा महिला कामगार चळवळीमुळे सन १९०८ मध्ये सुरू झाली. या दिवशी न्यूयॉर्क शहरातील १५,००० महिलांनी नोकरीचे तास कमी करण्यासाठी, चांगल्या पगाराची मागणी आणि इतर काही अधिकारांच्या मागण्यांसाठी निदर्शने केली. त्यानंतर एका वर्षांनंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने हा दिवस पहिला राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला. १९१० मध्ये कोपेनहेगन येथे महिला कामगारांची एक आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. त्यात हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आलं आणि हळूहळू हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून लोकप्रिय झाला. १९७५ मध्ये खऱ्या अर्थाने हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून ओळखला गेला जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने थीमसह हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.