इंधन दरवाढी विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

आंदोलनात कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांची उपस्थिती...

इंधन दरवाढी विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

सुमित दंडुके/औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल, गॅस, गोडतेल या सगळ्यांचा भाव गगनाला भिडला आहे. सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर याचे दर जात आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील जालना रोडवरील राज पेट्रोल पंप येथे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
fghjdgh
'राज्यात पेट्रोलचे भाव शंभर पार झाले आहे. सोबतच गॅस आणि गोडतेलाचे भाव देखील प्रचंड वाढले आहे. हे भाव सामान्य जनतेला परवडणारे नाही. याचा विचार केंद्र सरकार करीत नाही. एकीकडे कोरोनाची महामारी आणि दुसरीकडे ही भाववाढ, गोरगरीब जनता या भाववाढीमुळे पिळवटून निघाली आहे. त्यामुळे झोपलेल्या केंद्र सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत असल्याचे कल्याण काळे यांनी म्हटलं आहे'.
मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने शंभर रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेलही ९२ रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपयांवर येउन पोहोचला आहे. या दरवाढीमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. याच्याच निषेधार्थ कॉंग्रेसच्या वतीने हे राज्यव्यापी आंदोलन आज करण्यात येत आहे.

अखेर औरंगाबाद पूर्णत: अनलॉक !
शहर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात तर ग्रामीण तिसऱ्या टप्प्यात होणार अनलॉक...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.