काॅग्रेसने दिलेला शब्द पाळून दाखवला; कडुबाईंना मिळालं हक्काचं घर

अवघ्या दोन महिन्यांतच नाना पटोले यांनी घर आणि संसारोपयोगी साहित्यही उपल्बध करुन दिले.

काॅग्रेसने दिलेला शब्द पाळून दाखवला; कडुबाईंना मिळालं हक्काचं घर

औरंगाबाद : समाजाची व्यथा आपल्या गाण्यातून मांडणाऱ्या लोककलाकार कडुबाई खरात बेघर झाल्याचे कळताच काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना स्वखर्चातून घर देण्याची घोषणा केली. आज नाना पटोले यांच्या हस्ते त्यांच्या घराचा गृहप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

"तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे" या लोकप्रिय गीताच्या गायिका कडूबाई खरात यांचे घर औरंगाबाद महापालिका अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडण्यात आले होते. त्यांचा संसार उघड्यावर आला होता. दोन महिन्यापूर्वी मागासवर्गीय मेळाव्यात त्यांनी माजी सामाजिक न्यायमंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांना भेटून आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती देऊन मदत करण्याची विनंती केली होती. चंद्रकांत हंडोरे यांनी नाना पटोले यांना कडुबाई खरात यांना घर देण्यासंदर्भात मदत करण्याची विनंती केली असता, त्याच मेळाव्यात नाना पटोले यांनी कडूबाई खरात यांनी घर देण्याचे आश्वासन दिले होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.