काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोना मुळे निधन

कोरोनामुळे महाराष्ट्राने दोन आमदार गमावले

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोना मुळे निधन

मुंबईः नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन झाले आहे. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली पत्नी असा परिवार आहे. आज देगलूर इथे मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रावसाहेब जयवंत अंतापूरकर यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. मुंबई रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांचे निधन झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना', असे ट्वीट चव्हाण यांनी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.