काँग्रेसची विनंती मान्य, राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध

काँग्रेसची विनंती मान्य, राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध

मुंबई : काॅग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काॅग्रेसने प्रयत्न केले होते. अखेर काॅग्रेसच्या या प्रयत्नांना यश आलं आहे. भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय हे आपला अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळं आता राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काही दिवांसापुर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. कॉंग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.

६ रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर होती. तर ४ ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.