कॉग्रेस प्रवक्तांच्या भावावर बलात्काराचा गुन्हा

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वनमंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावर झालेले अत्याचाराचे आरोप आणि आता कॉग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

कॉग्रेस प्रवक्तांच्या भावावर बलात्काराचा गुन्हा

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील अत्याचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांचे प्रकरण ताजे असतानाच आता महाराष्ट्रातील कॉग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे याच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून मुंबईतील भोईवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार सुनीत वाघमारे यांना पोलीसांनी अटक केली आहे. तसेच पुढील तपास हा लोणावळा पोलीसांकडे देण्यात आला आहे.

संजय राऊतांकडून छळवणूकीचा प्रयत्न;उच्चशिक्षित महिलेची हायकोर्टात तक्रार
शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने गंभीर आरोप करत ′ ते माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा′ तक्रार अर्ज मुंबई हायकोर्टात दाखल केला.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वनमंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावर झालेले अत्याचाराचे आरोप आणि आता कॉग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याचबरोबर शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात एका उच्चशिक्षित महिलेने हायकोर्टात तक्रार दाखल केली होती. या सर्व प्रकरणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची नाचक्की होताना दिसत आहे.

सुनीत वाघमारेंच्या अटकेची कॉग्रेसने दखल घेतली असून सुनीत यांचा कॉग्रेसशी काहीही संबंध नसल्याचे ही कॉग्रेसने स्पष्ट केलं आहे. याबाबातचे ट्विट कॉग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. दरम्यान कॉग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. संजय राठोड यांचे प्रकरण ताजे असतानाच आता वाघमारे यांचे प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी सत्ताधा-यांना चांगलचं कोंडीत पकडलं आहे.

या प्रकरणाबाबत कॉग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विट मध्ये- ‘ कॉग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे संदर्भात भाजर फार चिंतन करीत असल्याचे समजते. माहिती साठी सांगतो सुनीत यांचा कॉग्रेसशी काहीही संबंध नाही. २०१७ साली मुंबई मनपा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले.’ असल्याचं म्हटलं आहे.

राऊतांचे ट्विट खरे,अखेर राठोडांचा राजीनामा
पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला होता. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात भाजपकडून रस्तारोको आंदोलने करण्यात आली.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.