इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस करणार राज्यव्यापी आंदोलन

राज्यातील एक हजार ठिकाणी तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान तीन पेट्रोल पंपांवरही हे आंदोलन केले जाणार

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस करणार राज्यव्यापी आंदोलन

मुंबईः वाढत्या इंधनदरवाढीविरोधात काँग्रेस आता आक्रमक होताना दिसते आहे. सोमवारी (उद्या) राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. राज्यातील एक हजार ठिकाणी तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान तीन पेट्रोल पंपांवरही हे आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्या होणार असलेल्या आंदोलनाची माहीती दिली. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने शंभर रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेलनेही 92 रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे. स्वयंपाकाचा गॅसही 900 रुपये लिटरवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधिच कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारच्या या अन्याया दरवाढीविरोधात उद्या (7 जून) रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

युपीए सरकार असताना पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती, ती आज 32.90 टक्के म्हणजे 258 टक्के आहे. तर डिझेलवर 3.56  रुपये होती ती आज 31.80 रुपये म्हणजे 820 टक्के आहे. या एक्साईज ड्युटीतुन मोदीसरकारने गेल्या 7 वर्षांत सुमारे 20 ते 25 लाख कोटी रुपयांची लुटमार केली आहे. 2001 ते 2014 या काळात पेट्रोल-डिझलवर प्रति लिटर 1 रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. 2018 मध्ये तो 18 रुपये प्रति लिटरवर गेला. सध्या पेट्रोल-डिझेलसाठी 18 रुपये प्रतिलिटर दर सेंट्रल रोड फंड आणि इंफ्रास्ट्रक्चरसाठी घेतले जातात. शिवाय कृषी सेसही घेतला जातो. या दरोडेखोरीविरोधात सोमवारी राज्यभर एकाच वेळी एक हजार ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या किमान तीन पेट्रोल पंपांवर मोदी सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.