सर्वसामान्यासाठी लोकल सुरु करण्याचा विचार करा,हायकोर्टाची सूचना

लोकल ट्रेन चालू करणं हाच एक पर्याय आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

सर्वसामान्यासाठी लोकल सुरु करण्याचा विचार करा,हायकोर्टाची  सूचना

मुंबईः लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बंद झाले, व्यवसाय बुडाले, मात्र आता अनलॉकच्या माध्यमातून हळूहळू व्यवहार सुरळीत होत आहेत. सरकारी, खाजगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरु झाली आहेत. तेव्हा लोकांच्या प्रवासाबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. कारण मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येकालाच रस्त्याने प्रवास करणं शक्य नाही. मुंबईबाहेरुन येणाऱ्यांचे काही तास प्रवासात जात आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन चालू करणं हाच एक पर्याय आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. वकिलांचाही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये समावेश करावा आणि त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी करत हायकोर्टात अॅड. उदय वारुंजीकर व अॅड. श्याम देवानी यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावर प्रायोगिक तत्त्वावर सुरु असलेल्या रेल्वे प्रवासाबाबत हायकोर्टाने प्रशासनाला 5 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लोकल सेवा बंद आहे, आपल्याला आता कोरोनासोबतच जगावे लागेल, हे असेच सुरु ठेवता येणार नाही असे न्यायमूर्ती गेल्या सुनावणीत म्हणाले. मात्र लोकल सुरु केली तर कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढेल. लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात त्यावेळी दिवसाकाठी 10 ते 12 जणांचा गर्दीने बळी जातो. लोकल सेवा सध्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांसाठी असताना त्यातही प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यात कोरोनाच्या परिस्थितीत लोकल ट्रेन सुरु केली तर कोविड रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढेल, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.